इस्रोने XPoSat अवकाश दुर्बिणीचं यशस्वीपणे केलं प्रक्षेपण..!

Edited by:
Published on: January 01, 2024 16:06 PM
views 91  views

२०२४ चे स्वागत करतांना पहिल्याच दिवशी  इस्रोने XPoSat नावाची अवकाश दुर्बिण नऊ वाजून ३० मिनिटांनी प्रक्षेपित केली. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंचीवर XPoSat ही ४६९ किलोग्रॅम वजनाची दुर्बिण यशस्वीपणे प्रक्षेपित केली.

या XPoSat वर Polarimeter Instrument in X-rays (POLIX) आणि X-ray Spectroscopy and Timing (XSPECT) अशी दोन वैज्ञानिक उपकरणे आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स रे – X-rays म्हणजेच क्ष किरणांच्या उगमांच्या स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर – black hole तसंच न्यूट्रॉन तारे यांची सखोल निरिक्षणे केली जाणार आहेत, या बद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.