कलमठ ग्रामपंचायतीला ISO मानांकन...!

गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 12, 2024 13:43 PM
views 128  views

कणकवली : तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीला आज आयएसओ मानांकन प्राप्त झाले , आज १२ मार्च रोजी कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात आयएसओ मानांकन  प्रमाणपत्र संस्थेचे सहदेव चव्हाण यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत कामात सुसूत्रता, कार्यालय दफ्तर वर्गीकरण, सर्व समित्या, कर्मचारी  काम वर्गवारी, पार्किंग, शासनाच्या योजना माहिती, दिशा दर्शक, नामफलक अश्या अनेक बाबींच्या पूर्तता करून ग्रामपंचायत स्थापने पासूनचे ५० वर्षाचे सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यात आले असून, त्या रेकॉर्डचे विलगीकरण करणे या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. यासाठी गेले ६ महिने ग्रामपंचायत काम करत असून सर्व ग्रामपंचायत टीमच्या मेहनतीने हे सर्व शक्य झाले असून या पुढे गावातील सर्व शाळा व अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे संदिप मेस्त्री म्हणाले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून गावाच्या विकासासाठी प्रत्येक घटकावर काम करणार आहोत असे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले. यावेळी आभार  ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी आभार मानले.

यावेळी माजी उपसभापति  मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य, महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्राम विकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रा. पंचायत सदस्य रवींद्र यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, प्रिती मेस्त्री, हेलन कांबळे, नजराना शेख तसेच ग्राम पंचायत कर्मचारी महेंद्र कदम, कुशल कोरगांवकर, गणेश सावंत, ज्योती आमडोस्कर, अंकिता राणे, रमेश चव्हाण, अण्णा सावंत, आबा कोरगांवकर, परेश कांबळी,समर्थ कोरगांवकर, स्वरूप कोरगांवकर, बाबू नारकर, रुपेश कदम, गौरव तांबे, मंगेश कदम, मोहन कदम, निखिल कुडाळकर, विनोद जाधव, उपस्थित होते.