
सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडीत रेल रोकोचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ गोव्याकडे जाणारी मंगलोर एक्स्प्रेसची साखळी ओढल्याचे समोर येत आहे. आज सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस ६ मिनिटे थांबल्याची माहीती समोर येत आहे. याला रेल्वे प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
या गाडीची साखळी अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ ओढण्यात आली. यानंतर काही वेळानं ट्रेन या ठिकाणाहून रवाना करण्यात आली. सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना प्रयत्नशील असून आज रेल रोकोचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ही गाडी या ठिकाणी चेन ओढून थांबवली गेली. त्यामुळे ही चेन का ओढली ? की प्रवाशांकडून आंदोलनाला समर्थन दिल ? असे प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही चेन का ओढली ? याबाबतच कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारलं असता सहा मिनिटं रेल्वे थांबली होती. सकाळी सात च्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती रेल्वे प्रशासनान दिली आहे.