
मंडणगड : संसद आदर्श ग्राम या योजनेच्या माध्यमातून 2014 साली मान्यता मिळालेल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे – लोणंद या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे 2025 सालाचे पुर्वाध संपत आला तरी पुर्ण झालेले नाही तालुक्याचे हद्दीतील 36 किलोमीटर इतक्या लांबीच्या अंतरातील कामाच्या सद्यस्थितीचे अवलोकन करता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यंदा काम पुर्ण करण्याची केलेली घोषणा व काम वेळेत संपवण्याच्या डेडलाईन गाठणे ठेकेदारास कठीण झाले आहे. शहर परिसरातील 2 किलोमीटर इतक्या अंतरात रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे कामास अद्याप सुरुवात झालेली नाही, याशिवाय मंडणगड ते पाले परिसरात रस्त्यास अजूनही दुभाजक असुन सिंगल लेनचे काम पुर्णत्वास गेले आहे. शेनाळे ते म्हाप्रळ परिसरातही सिंगल लेने चे काम पुर्णत्वास गेले आहे तुळशी व शेनाळे घाट परिसरातील अडचणींचे कामास अद्याप सुरुवात नाही. पाचरळ तुळशी येथे नव्याने तयार केलेला रस्ता खचला आहे, तुळशी चिंचाळी या ठिकाणी पुलाचे काम अद्याप सुरु असुन ते अर्धवट आहे. मंडणगड शहर भिंगळोली व पाचरळ येथे रस्त्याचे कामामुळे घरे दुकाने विस्थापीथ होणार आहेत त्याबद्दल प्राधिकरणाची भुमीका अद्याप स्पष्ट नाही. घाटांचे परिसरात रस्त्याचा विस्तारीकरणासाठी डोंगराकडील बाजूस उभे कटींग करण्यात आल्याने पावासाचे कालवधीत थोडसा पाऊस पडला तरी दरड कोसळून रस्ता बंद होतो गतवर्षी तुळशी घाटात 17 वेळा दरड कोसळल्याने ती साफ करुन रस्ता वाहतूकीस योग्य करण्यासाठी महसुल विभागाची चांगलीच दमछाक झाली होती.
आंबडवे – लोणंद या मंडणगड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अनेकदा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या कामास कोणाचाही विरोध नसताना न्यायालयाचे कारण दाखवून काम पुढे ढकलण्यात आले गत तीन वर्षापासून रस्त्याचे कामाने खऱ्या अर्थाने गती घेतली आहे. या कालावधीत एका ठेकेदारास रद्द करुन दुसऱ्या ठेकेदार कडे देण्यात आले परंतु महामार्गाच्या एकंदरीत कामाची परिस्थिती पाहता यंदाचे बांधकाम हंगामाचे अखेर पर्यंत महामार्गाचे काम पुर्णत्वास जाण्याची शक्यता मावळली आहे. काम संपवण्याची डेडलाईन ही हुलकावणी देणार असल्याची चर्चा सुरु आहे.राष्ट्रीय महा मार्गवरील अनेक पुलांची कामे व अर्धवट स्थितीत आहेत. तर काही ठिकाणी रस्ताही काँक्रेटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे ही कामे पूर्णतःवास जाण्यासाठी अजून किती कालावधी लागेल हे समोरील परिस्थिती पाहता सांगताच येणार नाही.
आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्ग 965 डी.डी. वरील महामार्गाचे काम गेली 11 वर्षांपासून सुरु आहे किती ठेकेदार आले. किती गेले परंतु हे काम अद्याप ही पूर्ण होऊ शकले नाही. याउलट अर्धवट कामामुळे या महामार्गांवर असंख्य अपघात झाले. अनेकांचे नाहक बळी गेले अनेकजण कायमचे जायबंद झाले आहेत. याला जबादार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया यामुळे तालुक्यातील जनतेतून उपस्थित केला जात आहेत.