आयपीएस अधिकारी सायली धूरत यांचा 'गाबीत भूषण'पुरस्काराने सन्मान

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2024 12:39 PM
views 391  views

मालवण : दांडी - मालवण येथील "गाबीत महोत्सवाचे" निमित्त साधून महाराष्ट्र राज्यातील गाबीत समाजातील विविध उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी,राष्ट्रीय खेळाडू,डॉक्टर्स, वयोवृध्द सुप्रसिध्द कलाकार,यांचा गाबीत समाज संस्थेतर्फे "गाबीत भूषण"पुरस्काराने सत्कार करण्यात आला होता.सदरील कार्यक्रमास त्या आपल्या शासकीय व्यस्त कामामुळे उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.म्हणून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री.परशुराम उपरकर,गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष सुजय धूरत,सरचिटणीस बाळा मणचेकर,समाज बांधव मणचेकर यांनी मुंबई येथे सायली धूरत यांची भेट घेऊन त्यांना "गाबीत समाज भूषण" पुरस्कार देऊन सन्मानित केले.तसेच त्यांना महाराष्ट्रातील विविध गाबीत समाज संस्थांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.