लकी ड्रॉमध्ये मिळाला आयफोन !

राज मोबाईलच्या भन्नाट ऑफरमुळे ग्राहकांची चांदी
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 29, 2023 11:52 AM
views 878  views

कणकवली : कणकवलीतील प्रसिद्ध राज मोबाईल येथे दसरा दिवाळीच्या निमित्ताने लकी ड्रॉ ऑफर्स ठेवण्यात आले होते. यामध्ये आयफोन, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट वॉच ही प्रथम तीन पारितोषिके होती. तसेच इतर लकी ड्रॉ विजेत्यांना नेक बँड अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.

तर यामध्ये 929 नंबर चे कुपन असलेले साई खोत यांना आयफोन बक्षीस स्वरूपात मिळाला आहे. तर इतर 25 स्पर्धकांना विविध अशा प्रकारची बक्षीस देण्यात आली. राज मोबाईलचे मालक संतोष अंधारी व संदेश राणे यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण करण्यात आलं