आयफोन 15 चे SS मोबाईल सावंतवाडीमध्ये लॉन्चिंग !

Edited by: विनायक गावस
Published on: September 22, 2023 18:14 PM
views 1131  views

सावंतवाडी : जगप्रसिद्ध ॲपल कंपनीच्या 15 सिरीजच्या आयफोनचे आज एस एस मोबाईल सावंतवाडीमध्ये दिमाखात अनावरण करण्यात आले. जगप्रसिद्ध अँपल कंपनीच्या 15 सिरीजच्या आयफोनचे शिवसेनेच्या सावंतवाडी शाखा प्रमुख भारती परब, सुप्रिता धारणकर, पुजा नाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पहिल्याच दिवशी सावंतवाडी येथून २३ आयफोन 15 सिरीजची विक्री झाली. यावेळी एस एस मोबाईलचे मालक अनिष स्वार, भार्गव धारणकर, ब्रँच मॅनेजर पार्णिका धारणकर यांच्यासह कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.