घोटगेत निमंत्रित खुल्या भजन स्पर्धा

Edited by: लवू परब
Published on: October 25, 2025 20:14 PM
views 31  views

दोडामार्ग : संत भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध अशा भूमीला भजन कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा तरुण पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे.  यालाच प्रोत्साहन देण्यासाठी श्री सातेरी धारेश्वर देवस्थान मंडळ घोटगे गेली २१ वर्ष भजन स्पर्धेचे आयोजन करत आहे. यावर्षी सुद्धा श्री सातेरी धारेश्वर देवस्थान वार्षिक हरिनाम सप्ताह निमित्त दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी निमंत्रित खुल्या भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे.

या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सात हजार रुपये संदीप भिकाजी दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये प्रसाद लवू दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. तृतीय पारितोषिक महेश गणपत गवस त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक सुशांत सूर्याजी दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. उत्कृष्ट हार्मोनियम सचिन राजाराम दळवी उत्कृष्ट तबला रामचंद्र सुरेश दळवी, उत्कृष्ट गायक  सचिन सुरेश दळवी, उत्कृष्ट पखवाद विजय रामचंद्र दळवी यांनी पुरस्कृत केले आहे. तर सर्व विजेत्यांसाठी सुमित गोपाळ दळवी यांच्याकडून सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आली आहेत.

 सर्व भजनी संघांना अल्पोपहाराची व्यवस्था विकास नारायण दळवी व अनिरुद्ध अरुण दळवी यांच्याकडून करण्यात आली आहे. या दिमाखदार भजन स्पर्धेत भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन घोटगे ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संदीप दळवी ९४२१२६५२४२ त्यांच्याशी संपर्क साधावा.