कर्नाटक सोने चोरी प्रकरणी कणकवलीतील सुवर्णकारांची चौकशी

Edited by: कणकवली
Published on: July 27, 2023 16:18 PM
views 1917  views

कणकवली : वागदे येथे सापडलेल्या सराईत चोरट्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या आरोपीने कणकवलीत ६०० ग्राम सोने कणकवलीत सुवर्णकाराला विकल्याची कबुली दिली होती. त्यानुसार कर्नाटक पोलीस त्या आरोपीला घेऊन आज कणकवलीत दाखल झाले. त्या आरोपीने दाखवल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी कणकवलीत एका सुवर्णकारास चौकशीसाठी कणकवली पोलिसांना बोलावण्यात आले. त्यावेळी कणकवली शहरातील सर्वच सुवर्णकार व भाजप कार्यकर्ते  पोलीस ठाण्यात जमा झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. 

कणकवली शहरातील भालचंद्र महाराज आश्रमात हे सुवर्णकार आरती करण्याकरता थांबलेले असताना संशयीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार या सुवर्णकारास कर्नाटक पोलिसांनी विचारणा केली व त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले  असता कणकवलीतील सुवर्णकार संघटना तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी , कणकवलीतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान वागदे येथे सापडलेल्या आरोपीकडून कणकवलीत एकाकडे आटणीकरिता सोने आणले होते. त्या वागदेतील गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रकाश पाटील हे नाव सांगितल्याने संबंधित सुवर्णकारास ताब्यात घेतल्याचे कर्नाटक पोलिसांनी कणकवलीत पोलीस ठाण्यात  माहिती दिली. त्या सुवर्णकरांना नोटीस देऊन कर्नाटक पोलिसांकात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले.