
सिंधुदुर्ग : नवदोत्ततर कालखंडातील मराठी काव्य क्षेत्रात आपले नाव आधोरित करणारे कोकणातील कवी, ललित लेखक व राजापूर तालुक्यातील कुंभवडे या ग्रामीण भागामध्ये 25 वर्षे विद्याधनाचे काम करणारे प्रा.मोहन कुंभार यांच्या शैक्षणिक कार्य व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्या प्रति असणारे आस्था याची नोंद घेऊन आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने त्यांची ग्रामीण शिक्षण व समस्या याविषयीची मुलाखत घेतली आहे. मराठी कवितेतील मोहन कुंभार हे महत्त्वाचे नाव. त्यांचा जगण्याची गाथा हा कवितासंग्रह व कोवळं आभाळ हा ललित लेख संग्रह प्रकाशीत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागात भाग समजल्या्या कुंभवडे या ठिकाणी ते 25 वर्षे शिक्षक म्हणून काम करीत आहेत. हे काम करत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यानी अनेकक उपक्रमांची निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या मनोरंजना बरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर घालण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. लेखन, वाचन, गीत गायन, नृत्य, वकृत्व अशा विविधांगी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी ते नेहमीच गुंतलेले असतात. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या शिक्षण संक्रमण या मासिकाने घेऊन त्यांच्या या कार्याचे मनोगत प्रकाशित केले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे त्यांची अभ्यासक्रम निर्मिती सदस्य म्हणूनही निवड झाली होती.