
सिंधुदुर्गनगरी : आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारच्या व्याधीने त्रस्त आहेत. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. 'योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. योगामुळे मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जीवन आनंदी, उत्साही व निरोगी ठेवण्यासाठी योगाची खूप आवश्यकता असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख म्हणाले. जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग, जिल्हा आयुष विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सिंधुदुर्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे ठिकाणी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी प्रशालेचे विदयार्थी व शिक्षक, तसेच नागरीकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या Common Yoga Protocol नुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव यांनी योग प्रात्याक्षिकांव्दारे योग शिकविला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी.गायकवाड, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. एस.के. संपुर्णकारंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रदिप कुडाळकर, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, नेहरु युवा केंद्राच्या कार्यक्रम सहाय्यक अपेक्षा मांजरेकर तसेच सर्व विभागातील कार्यालय प्रमुख योग दिन कार्यक्रमास उपस्थितीत होते.