
सिंधुदुर्गनगरी : दिनांक 21 जून 2024 रोजी. डॉन बॉस्को हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ओरोस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे. आजच्या धक्काधक्कीच्या व धावपळीच्या काळात मानवाचे जीवनमानात झपाट्याने बदल होत असून वेळेअभावी व वैयक्तिक कारणांमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे दुष्पपरिणाम लक्षात घेऊन आरोग्याच्या व शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी योगासने व प्राणायाम यांचे मार्गदर्शन नेटक्या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. सुरुवातीला योग दिनाचे महत्व प्रतिपादन करण्यात आले. सालाबादप्रमाणे प्रशालेचे जेष्ठ क्रीडा शिक्षक. श्री रोहिदास राणे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली सदरची योगासने व प्राणायाम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक सर्वश्री सर जेसन, सर बॉंनी, सहशिक्षिका जुई शेर्लेकर व सहकारी शिक्षकांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तत्पूर्वी डॉन बॉस्को प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी. मुख्य कार्यक्रमांमध्ये सकाळी 7.15 वाजता उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व योगाचे विविध प्रकारांचे प्रात्यक्षिके करण्यात आली. कार्यक्रमा शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव. यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपक्रमाचे खूप कौतुक केले.