
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सावंतवाडी शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचाही गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच शिक्षिका श्रीमती मारिया पिंटो यांनी समाजातील स्त्रियांच्या भरीव कामगिरीबाबत त्यांचे कौतुक करत आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच सर्वांनीच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.