दोडामार्गात आंतरराज्य कब्बडी स्पर्धा आयोजन..!

शिवसेनेकडून शिक्षणमंत्री केसरकर यांचा विशेष सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: February 23, 2024 05:42 AM
views 170  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील कबड्डी खेळासाठी आंतरराज्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा दोडामार्ग तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.  तालुक्यात आमदार चषक 2024 ही भव्य दिव्य आंतरराज्य कबड्डी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

या स्पर्धेत तालुक्यातील तेरा संघ तर राज्यातील कोल्हापूर, गोवा व सिंधुदुर्ग येथील बारा संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमुळे राज्यातील कबड्डी खेळाडूंना आपल्यातील कबड्डी खेळाच कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. पण तालुक्यातील शेकडो कबड्डी खेळणारे खेळाडू व हजारांच्या संख्येने उपस्थित कबड्डीप्रेमी या सगळ्यांना प्रो कबड्डी च्या धरतीवर दर्जेदार असा कबड्डी खेळ, आंतरराज्य स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंकडून पाहता आला.

आ. दीपक केसरकर मित्रमंडळ व मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील कबड्डी खेळाडू व कबड्डी प्रेमींसाठी यानिमित्ताने चांगली संधी उपलब्ध झाल्याबद्दल तालुका शिवसेनेच्या वतीने गणेश प्रसाद गवस यांनी या कबड्डी स्पर्धेला खास उपस्थिती दर्शविलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा विशेष सन्मान केला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी यांसह गोपाळ गवस, तिलकांचंन गवस, दादा देसाई, दयानंद धाऊसकर, भगवान गवस आधी पदाधिकारी उपस्थित होते.