फळपिकांचा विमा परतावा रक्कम तात्काळ मिळावी

अन्यथा आंदोलन ; उबाठा शिवसेनेचा इशारा
Edited by:
Published on: November 23, 2023 20:13 PM
views 222  views

वैभववाडी : तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा फळपीक विमा परतावा अद्याप मिळाला नाही.विमा कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची परतावा रक्कम रखडली आहे.येत्या २८नोव्हेबर पर्यंत तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांची विमा परतावा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा शिवसेना (उबाठा) तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.याबाबतचे निवेदन शिवसेना पदाधिकारी यांनी नायब तहसीलदार यांना दिले.

तालुक्यातील फळबागातदारांना मागील वर्षीचा फळपीक विमा परतावा अद्याप मिळाला नाही.त्यामुळे यावर्षीचा विमा घेण्यास शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.तालुक्यातील अनेक शेतकऱी विमा परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.विमा कंपनीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.तसेच तालुक्यातील चार मंडळापैकी वैभववाडी,एडगाव व कुसुर या  तीन मंडळांमध्ये अद्याप विमा परतावा मिळालाच नाही.विमा कंपनीच्या या कारभारामुळे यावर्षीच्या विमा संरक्षित क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो . शेतकऱ्यांच्या या विषयासंदर्भात आपण लक्ष घालावे.सर्व विमाधारक शेतकऱ्यांना २८नोव्हेबरपर्यंत परतावा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर ही रक्कम जमा करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी संचालक दिगंबर पाटील,युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, उपविभागप्रमुख यशवंत गवाणकर, कोळपे सरपंच सुनील कांबळे,खांबाळे उपसरपंच गणेश पवार,माजी सरपंच नाना रावराणे, अनिल नराम,राजेश तावडे, शंकर कोकरे, मंगेश सूद,बबन धुरी,उमाकांत राणे,गंगाराम काळे आदी उपस्थित होते.


फोटो ओळी वैभववाडी तालुक्यातील फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा  परतावा तात्काळ मिळावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाने तहसीलदार यांना निवेदन दिले.