
सावंतवाडी : भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले होते. माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले.
गेले पंधरा-वीस दिवस हे बांधकाम खोदाई सुरू केली. दोन ते तीन दिवसात काम करतो असे ठेकेदारान सांगितले होते. मात्र, त्यास पंधरा-वीस दिवस उलटून गेले. याचा नागरिकांना नाहक त्रास होत होता. याची दखल घेत माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार सरडे, मनोज राऊळ, प्रदीप कशाळीकर व ठेकेदार नाईक यांना गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले. यावेळी भटवाडीतील नागरिक हर्षवर्धन धारणकर आदी उपस्थित होते