
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय समाजाला लाभ देण्यासाठी तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत ही योजना पोहचवून सहकार्य करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
तृतीयपंथी व्यक्तींचे वैयक्तिक निवास विषयक माहित, स्थलांतर, शिक्षण विषयक माहिती, लाभ मिळालेल्या योजना विषयी माहिती, आरोग्यविषयक माहिती व स्मार्टकार्ड इत्यादी माहिती त्वरीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे समक्ष भेट देऊन योजनेविषयक आपल्या आवश्यक मागणी असलेल्या साहित्यासाठी (कॉप्युटर, प्रिंटर, घरगंटी इ,) अर्ज व कागदपत्रे सादर करावीत. तसेच या समाजासाठी काम करणाऱ्या सस्थांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संतोष चिकणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस फोन नं.- 02362 -228882 वर संपक साधवा.










