विनायक राऊतांच्या खासदारकीची प्रतिष्ठापना माझ्या आंदोलनातून : दिपक केसरकर

Edited by: भरत केसरकर
Published on: March 24, 2024 14:50 PM
views 78  views

सावंतवाडी : कुडाळ येथील सभेसाठी पैसे देऊन भाड्याने गाड्या आणल्या असतील तर त्यात वावग काय आहे ? प्रत्येक कार्यकर्त्याकडे गाडी असतेच असं नाही. त्यामुळे भाड्याने गाड्या आणायला लागतात. या सभेसाठी माणसं भाड्याने आणली नव्हती तर गाड्या या भाड्याने आणल्या असतील आणि यात वावग असं काहीच नाही. असा खुलासा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील सभेसाठी भाडोत्री माणसं आणली अशा पद्धतीचा एक व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे.यावर उत्तर देताना दीपक केसरकर बोलत होते.सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट येथील आपल्या निवासस्थनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले खासदार विनायक राऊत यांच्या खासदारकीची प्रतिष्ठापना माझ्या आंदोलनातून झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची ही लोकसभेची जागा 2014 आणि 2019 साली निवडून येऊ शकली. ती माझ्यामुळे येवू शकली, हे उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊतांनी सुद्धा मान्य केले आहे. त्यामुळे उगाचच बदनामीकारक टीका विनायक राऊत यांनी करू नये. त्यामुळे माझे आणि अजित पवारांचे विसर्जन करण्याची सावंतवाडीत भाषा करणाऱ्या विनायक राऊतांनी  विसर्जन कोणाचं होणार हे लवकरच समजेल. असा उपराधिक टोला विनायक राऊत यांना लगावला आहे.विनायक राऊतांनी इंडिया आघाडीच्या सावंतवाडीतील सभेत दिपक केसरकर आणी अजित पवारांचे लवकरच विसर्जन होईल असे वक्तव्य केले होते.याचा दिपक केसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला.

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा जागावाटप अद्याप तिला सुटलेला नाही यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा  लोकसभा मतदारसंघाचे तिकीट अद्याप कोणाला मिळालेले नाही आहे. त्यामुळे तिकीट मिळण्याआधीच कोणाचे तिकीट कापले गेले असे वक्तव्य उबाठाने करू नये. आणि महायुतीमध्ये कोणाला तिकीट मिळेल अगर न मिळेल हा आमचा प्रश्न आहे. उगाचच उबाठाने यात नाई खूपसू नये. उबाठाची निर्मिती यातूनच झाली आहे. असा उपरोधिक टोला उबाठा सेनेला दिपक केसरकर यांनी लगावला आहे. तिकिटावरून भाजपवर केलेल्या टिकेवर बोलताना दीपक केसरकर यांनी जोरदार टिका केली आहे. 

   ऑन ड्रेसकोड आणी संचमान्यता जीआर दिपक केसरकर म्हणाले ड्रेस कोड आणि संचालक मान्यतेबाबत कुठच्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही. मात्र शिक्षक संघटनेने आंदोलन करण्याऐवजी मला येऊन प्रत्यक्ष भेटावे आणि चर्चा करावी.चर्चेअंती निश्चितच तोडगा निघेल.आज पर्यंत महाराष्ट्रातील कुठच्याही शिक्षण मंत्रान काम केल नाही आणी त्यांना जमलं नाही तेवढं आपण काम प्रामाणिकपणे केला आहे.हे सर्वांना माहीत आहे आणी कोण विसरू पण शकत नाहीत अशा शब्दात दीपक केसरकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

राज ठाकरे महायुतीत आल्याने महायुतीची ताकद वाढेल का? आणी ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात भाजपचं काही चालतच नाही या उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की राज ठाकरे वर बोलण्यापेक्षा राज ठाकरेंना दुय्यम कोणी लेखलं? हे पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी पहाव. खरंतर राज ठाकरे यांचा स्वतःच एक वेगळं अस्तित्व आणी दर्जा आहे.मात्र त्यांना दुय्यम लेखण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. परंतु याच राज ठाकरे यांच्या जवळचे 14 आमदार बाजूला गेले तेव्हा कोणाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद गेलं? याची जाण ठेवा अशा शब्दात उद्धव ठाकरेंना दीपक केसरकर यांनी टोला लगावला 

याच मुद्यांचा आधार घेत दिपक केसरकर म्हणाले स्वतःच्या भावाला संपवण्याची वृत्ती आहे.राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशावर बोलत केसरकर म्हणाले दुसऱ्याला औरंगजेब म्हणणं आणि हिणवणे योग्य नाही. तुमच्या आजूबाजूला किती औरंगजेब आहेत?हेच औरंगजेब तुम्हाला भारी ठरत आहेत.याची जाणीव ठेवून बोला.उगाजच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करत बसू नका. अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर जहरी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. औरंगजेब हे एका वृत्तीचे प्रतीक आहे. स्वतःच्या भावाला संपवणाऱे आणी स्वतःच्या वडिलांचे चांगले विचार संपवणारी वृत्ती म्हणजे औरंगजेब होती.हीच वृत्ती तुमची आहे का?असा सवाल उपस्थित केला आहे.

 सध्या खोटी सहानुभूती मिळवून विजय मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.या खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर दिले जाईल.असे दिपक केसरकर यांनी सांगून पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.खोटी सहानुभूती मिळवून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. जनतेला खोटं सांगितलं जातं आणि त्यावर मते घेण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितच येणाऱ्या लोकसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन जनतेला वस्तुस्थिती काय आहे? हे पटवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आम्हाला खोटं ठरवून हे वाघ बनू पाहत आहेत. मात्र जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. असही दीपक केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.तर आपल्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती घेवून पूर्ण करेन असेही दिपक केसरकर यांनी बोलताना स्पष्ट केल.