
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामार्फत आरोग्य तपासणी व जनाजगृती करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कणकवली आगारात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ४३ जणांची तपासणी करण्यात आली.
डॉ. शंतनू मसिरकर, नेहा पाताडे, प्रियांका चव्हाण, सायली सावंत, शीतल पालव, साईल गावडे यांनी एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, सवानि अजित कदम, विनय राणे, बाबू मुळदेकर आदी कर्मचारी उपस्थितीत होते.