देवगड बस स्थानकाची सर्वेक्षण कमिटी सदस्यांकडून तपासणी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 12, 2023 19:43 PM
views 164  views

देवगड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत देवगड बस स्थानकाचे सर्वेक्षण कमिटी सदस्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने १ मे २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत सदरचे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर विभाग नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर विभाग कमिटी ने देवगड बस स्थानकाची तपासणी करण्यात आली.

यामध्ये बस स्थानकाची स्वच्छता, रंगरंगोटी ,शौचालयाची स्वच्छता, बस स्थानक परिसराची स्वच्छता, एसटी बसेसची स्वच्छता तसेच परिसर ,अन्य बाबींची तपासणी करन्यात येऊन गुणांकन देण्यात आले आहेत . आणि या सर्वेक्षणात उत्कृष्ट बस स्थानक निवडण्यात येणार असून अशा बस स्थानकाला बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या टीम मध्ये कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के ,उपयंत्र अभियंता सुकन्या मानकर, कामगार अधिकारी संदीप भोसले, विभागीय भंडार अधिकारी संग्राम शिंदे पत्रकार प्रवासी मित्र प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी तपासणी केली.व गुणांकन दिले.

यावेळी देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर लेखा धिकारी श्रीकांत शेळके,पत्रकार गणेश आचरेकर ,वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरुखकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते. देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी कोल्हापूर वहातुक नियंत्रक अनघा बारटक्के यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.