आयएनएस गुलदार युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल

Edited by:
Published on: March 16, 2025 18:20 PM
views 132  views

देवगड : आयएनएस गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे.आयएनएस गुलदार या युद्धनौके मुळे पर्यटनाची नवी दारे खुली होणार आहेत. INS गुलदार ही युद्धनौका नेव्हीतून रिटायर झाली असून ही नौका विजयदुर्ग बंदरात येथील पर्यटन वाढावे म्हणून आणण्यात आली आहे.या युद्धनौकेचे पर्यावरणदृष्ट्या स्वच्छता अभियान राबवून नंतर ही नौका विजयदुर्ग बंदरात पर्यावरणदृष्ट्या क्लिनिंग साठी आणण्यात आली आहे.पर्यटकांना पाण्याखालून पाहण्यासाठी ही बोट उपलब्ध असणार आहे.यासाठी आवश्यक असलेल्या पाणबुड्या व अन्य सुविधा पर्यटन महामंडळ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समजते आहे.

महाराष्ट्रात युद्धनौका पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित होणार आहे. भारत सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत, भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज INS गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) कडे सुपूर्द केले आहे. हे जहाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ   समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.भारतीय नौदलाच्या बंद केलेल्या युद्धनौकेचा अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, निवृत्त जहाजांना कृत्रिम खडकांमध्ये रूपांतरित करून सागरी पर्यावरण संवर्धनास मदत करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. हा पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपाय मानला जातो, जो स्थानिक पर्यटन आणि सागरी जैवविविधतेला चालना देतो.

INS गुलदार हेपोल्नोक्नी-क्लास लँडिंग जहाज असून, पोलंडमधील ग्दानिया शिपयार्ड येथे ३० डिसेंबर १९८५ रोजी बांधले गेले. हे जहाज १९८५ ते १९९५ या काळात पूर्व नौदल कमांडचा भाग होते आणि त्यानंतर अंदमान-निकोबार कमांडमध्ये समाविष्ट झाले. याने तब्बल ३९ वर्षे देशसेवा करत ३,९०० दिवस समुद्रात घालवले आणि ४९० हून अधिक समुद्रकिनारी ऑपरेशन्स यशस्वीरित्या पार पाडली. INS गुलदारने ऑपरेशन अमन, ऑपरेशन आझाद, ऑपरेशन पवन आणि ऑपरेशन ताशा यांसारख्या महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये भाग घेतला. १२ जानेवारी २०२४ रोजी हे जहाज निवृत्त झाले. MTDC या जहाजाचे रूपांतर करण्यासाठी पुढील प्रक्रिया पार पाडणार आहे:

ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन यांचा संगम

हे जहाज भविष्यातील पिढ्यांसाठी एक ऐतिहासिक स्मारक ठरणार आहे. INS गुलदारने ज्या शूर नौसैनिकांची सेवा पाहिली, त्यांची शौर्यगाथा या प्रकल्पाद्वारे कायमस्वरूपी जतन होणार आहे. भारतीय नौदलाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे सिंधुदुर्ग हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध पाण्याखालील पर्यटन स्थळ होण्याची शक्यता आहे. संपूर्ण स्वच्छता: कोणतेही संभाव्य प्रदूषक किंवा घातक पदार्थ काढून टाकणे. पर्यावरणीय मंजुरी: सागरी संवर्धन नियमांनुसार आवश्यक परवानग्या मिळवणे. सुरक्षित बुडवणे: सिंधुदुर्ग किनाऱ्यावर सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन जहाज पाण्याखाली नेणे. सागरी पर्यावरण संवर्धन व पर्यटनाचा विकास, एका वर्षाच्या आत, बुडवलेले जहाज कोरल रीफसारख्या स्वतंत्र परिसंस्थेत रूपांतरित होते, ज्यामुळे मासे, कोरल, स्पंज आणि समुद्री जैवविविधतेला अधिवास मिळतो. अशा कृत्रिम रीफ्समुळे सागरी संवर्धन, मच्छीमारांसाठी संधी आणि पाण्याखालील पर्यटन वाढते.

MTDC अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या प्रकल्पामुळे भारताच्या सागरी पर्यटनाला मोठी चालना मिळेल. युद्धनौकांचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून, त्याचे संरक्षण करण्या च्या दृष्टीने एक पाऊल पुढे ठेवणारा नक्कीच ठरेल एवढे मात्र खरे.