इनरव्हीलनं करून दिली सावंतवाडी महोत्सवाची आठवण : पल्लवी केसरकर

महोत्सवास शानदार शुभारंभ ; 3 वर्षांचा बॅकलॉग भरून काढला
Edited by: विनायक गांवस
Published on: December 23, 2022 20:13 PM
views 336  views

सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडीत इनरव्हील महोत्सवाचा शानदार शुभारंभ महोत्सव झाला. या महोत्सवानं तब्बल तीन वर्षे न झालेल्या सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून हा 'इनरव्हील महोत्सव' आयोजित करण्यात आला होता. माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या शुभहस्ते शुक्रवारी ह्या महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. २३, २४, २५ असे तीन दिवस जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे हा महोत्सव होत आहे. 


कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करण्यात आला. याला सावंतवाडीकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला. माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत या इनरव्हील महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सुरूवातीला इनरव्हीलच्या माध्यमातून पल्लवी केसरकर यांच स्वागत करण्यात आल‌. दीपप्रज्वलनानं या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर म्हणाल्या, सावंतवाडीत खुप दिवसांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तुम्हाला पाहून खून आनंद झाला. हा महोत्सव पाहून सावंतवाडी महोत्सवाची आठवण झाली. इनरव्हील न पेटवलेली ही ज्योत कायम प्रज्वलित राहील, ‌हा महोत्सव नक्कीच यशस्वी होईल असा मला विश्वास आहे. इनरव्हीलन आजवर सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. गेल्या 40 वर्षांपूर्वीचा इनरव्हीलचा उत्साह कमी झालेला नाही, तो आजही कायम आहे‌. मी इनरव्हीलची सदस्य असल्याचा अभिमान वाटतो. महोत्सवासाठी इनरव्हीलन घेतलेल्या महिलांनी मेहनत फळाला आली आहे. तीनही दिवस या महोत्सवास उपस्थित राहून मनोरंजनाच्या मेजवानीच्या आस्वाद घ्यावा असं आवाहन करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.



दरम्यान, पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा पल्लवी केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, 'पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स, ग्रुप डान्सनी उपस्थित रसिकांच मनोरंजन केल. मिडीया पार्टनर कोकणच नंबर वन महचॅनल कोकणसाद LIVE नं या महोत्सवाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करत जगभरात हा महोत्सव पोहोचवला. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, आयएसओ देवता हावळ, एडिटर डॉ. सुमेधा नाईक- धुरी, डॉ. सुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी, मृणालीनी कशाळीकर आदि उपस्थित होते.


 तीन दिवस हा महोत्सव चालणार असून महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणारी ''इनरव्हील क्वीन'' ही स्पर्धा ३० ते ५० या वयोगटातील महिलांसाठी आयोजित केली आहे. शेवटच्या दिवशीच हे खास आकर्षण असणार आहे. .


दरम्यान,कोरोना काळात उद्योगधंद्यात आलेल्या मंदीनंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील लघु उद्योजकांना स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणी असणाऱ्या मेजवानीवर खवय्यांंनी ताव मारला‌. सेल्फी पॉईंट हा या महोत्सवाच खास आकर्षण ठरला. रसिक श्रोत्यांच्या गर्दीन सावंतवाडी मोती तलाव काठ फुलून गेला होता.