
सावंतवाडी : इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या इनरव्हील महोत्सवाच्या लोगोच अनावरण मंगळवारी करण्यात आले. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी शिव उद्यान इथं हा महोत्सव होत आहे. यात पाककला, रेकॉर्ड डान्स, ग्रुप डान्स, स्टॅच्यू, इनरव्हील क्वीन स्पर्धांच आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या महोत्सवाचा लोगोच अनावरण करण्यात आल. या महोत्सवात जास्तीत-जास्त लोकांनी सहभागी व्हावं, असे आवाहन करण्यात आले. यावेळी दर्शना रासम, देवता हावळ, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, पूजा पोकळे, रिया रेडीज, शकुन म्हापसेकर, भारती देशमुख, साधना रेगे, मीना जोशी, श्रेया नाईक आदी इनरव्हील मेंबर्स उपस्थित होते.