
बांदा : सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव ग्रामपंचायत नळ योजना टाकी दुरुस्तीचा शुभारंभ सरपंच नयना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गावचे मानकरी रवी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच प्रज्ञा देसाई, ग्रामसेविका विणा धुरी, सदस्य उज्ज्वला देसाई, पोलीस पाटील अरविंद देसाई, सतिश गवस, उदय देसाई, प्रकाश देसाई, सदा देसाई, अक्षय स्वार आदी उपस्थित होते. पडवे माजगाव ग्रामपंचायतच्या नळयोजना टाकीला बरीच वर्षे झाल्याने व गळती असल्याने तिच्या दुरुस्तीची आवश्यकता होती. त्यामूळे गावकरी ग्रामस्थाना नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत ने सर्व प्रथम गावच्या पाणी प्रश्न निकाली काढण्याच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्याच पार्शवभूमीवर गावच्या नळयोजना टाकी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.