संतापजनक | नऊ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग | नराधमाला अटक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 24, 2023 11:06 AM
views 1196  views

वैभववाडी : नऊ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा  धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात काल ता. २२ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला.या प्रकरणी पोलीसांनी पोक्सोंतर्गंत त्यांचं गावातील २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी रात्री त्या संशयिताला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी  दिली आहे.

तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासमवेत राहते.काल तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती.ती व तिचे वडील घरी होते.दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडील मोबाईल चार्जींग लावण्यासाठी संशयितांच्या घरी गेले. ही संधी साधुन तो संशयित त्यांच्या घरी गेला. घरी एकटी असलेल्या नऊ वर्षीय मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला.अवघ्या काही मिनिटांत त्या मुलीचे वडील घरी आले.त्यावेळी हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

त्यानंतर त्यांनी त्याला तेथुन हाकलुन दिले.यासंदर्भात त्यांनी काल सायकांळी उशिरा वैभववाडी पोलीसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी संशयिताविरोधात पोक्सोंतर्गंत गुन्हा दाखल केला.या प्रकाराची माहीती वरिष्ठांना दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे वैभववाडीत दाखल झाले.त्यांनी सर्व प्रकार जाणुन घेतल्यानंतर पोलीसांनी तातडीने त्या संशयितांला त्याच्या घरातुन अटक केली.आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.