
दोडामार्ग : एकात्मिक बाल विकास सेवा सस्थेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी - सिंधुदुर्ग (नागरी ) तर्फे बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुली व महिलां साठी दोडामार्ग येथील कसई गावठाण अंगणवाडी येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमासाठी कसई दोडामार्ग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मा. देविदास गवस उपस्थित होते. त्याचबरोबर किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी , स्वच्छता व काळजी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.केतकी गवस तसेच कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याविषयी माहिती देण्यासाठी अॅड. संध्या राणे उपस्थित होत्या तसेच प्राध्यापक संदीप गवस व डॉ.खडपकर तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ऋतुजा गवस याही उपस्थित होत्या.
सुरुवातीला बीटच्या मुख्य सेविका साधना पागी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. केतकी गवस यांनी किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी स्वच्छता व काळजी याविषयी माहिती दिली. त्यानंतर ऍड संध्या राणे यांनी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदे अंतर्गत महिलांना माहिती दिली . तसेच स्त्री-पुरुष समानता, मुलींचे संरक्षण, लिंगभेद चाचणी प्रतिबंध कायदा याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रा. संदीप गवस यांनी महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले व असे कार्यक्रम वारंवार घेण्यात यावे असे सांगितले. त्यानंतर डॉ. खडपकर यांनी हिमोग्लोबिन तपासणीसाठी हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प लावण्याविषयी सुचवले. उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी महिलांना बचत गट निर्माण करण्याविषयी सांगितले. महिलांना आर्थिक सहाय्य मिळून महिला स्वावलंबी होतील अशा विविध योजनांविषयी माहिती दिली. शेवटी अंगणवाडी सेविका श्रीशा राणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.