
सावंतवाडी: आत्मनिर्भर कोकण या अभियानाअंतर्गत 'मेक ईन कोकण' ला चालना देण्यासाठी भव्य "उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव"चे आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना विशाल परब यांनी आपला वाढदिवस सामाजिक दृष्टीकोनातून साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
या अनुषंगाने "मेक ईन कोकण" अंतर्गत सर्वच क्षेत्रातील लघू,मध्यम उद्योजक, शेतीपुरक उद्योग,सागरी उद्योग,पशुपालन व दुग्धोद्योग, मत्स्य उद्योग, अपारंपारिक ऊर्जा उद्योग, खाद्योद्योग, कुटीरोद्योग, महिला बचत गटांची उत्पादने, व्यापार व व्यवसायातून आलेल्या उत्पादनांचे "लोकल टू ग्लोबल" प्रदर्शन व विक्रीसाठी चाळीस स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेत. दिनांक १८ व १९ ऑक्टोबर २०२५ रोजी हे प्रदर्शन राणीपार्वती देवी, हायस्कूल, सावंतवाडी येथे भरणार आहे. बेरोजगारांना व्यवसायिक बनवण्यासाठी तसेच नव उद्योजकांना, प्रोत्साहन, प्रशिक्षण, देवून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारी व्यवस्था म्हणजेच "मेक ईन कोकण" होय.
यानिमित्ताने आयोजित भव्य उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव" मध्ये आपण मोठ्या संखेने सहभागी व्हा, स्वावलंबी व्हा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.