रिल्स स्पर्धेत पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

Edited by: विनायक गांवस
Published on: November 20, 2025 19:24 PM
views 188  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिकअंबाजी कर्ले कला, वाणिज्य महाविद्यालयाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धेचा निकाल 16 नोव्हेंबरला जाहीर झाला. या स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य  महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या विद्यमाने करिअर कट्टा आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्पर्धा परीक्षा व करिअर कट्टा यावर भाष्य व्यक्त करणारी रिल्स सादर करण्यात आली होती. महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षा व करिअर कट्टा विषयातर्गत 'स्वप्न बघणं सोपं असतं ते साकार करण्याचे देह करिअर कट्टा देतो' अशी संदेश देणारी रिल्स सादर करण्यात आली होती.स्पर्धेत राज्यातील 154 महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयाच्या मुकेश जाधव, प्रसाद कदम, साक्षी शिद्रुक, वैभव झाजम, सिद्धी सावळे, पंकज लाड, अक्षय हिर्लेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रिल्स स्पर्धेचे दिग्दर्शन  व कॅमेरामन प्रसाद कदम यांने केले.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभाग प्रमुख प्रा. अक्षता मोंडकर, सहाय्यक प्राध्यापक कोमल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नेत्रदीपक यश संपादन केलेल्या सर्वांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, सर्व संस्था पदाधिकारी,संचालक,प्राचार्य समीर तारी व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले.