सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 14:33 PM
views 32  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये  दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सकाळी  ठीक  ७.३० वाजता सेंट्रल इंग्लिश स्कूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले. 

तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त  प्रशालेत पालकांसाठी विविध  मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळामध्ये पालकांबरोबरच उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळाचा आनंद घेतला.  स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक पालंकाना बक्षीस स्वरूपात भेटवस्तू  देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील  या कार्यक्रमांला सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष . इम्तियाज खानापूरी, उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सहसचिव  सुलेमान बेग , खजिनदार ईस्माइल शेख , विश्‍वस्थ . परवेज बेग ,  मुश्ताक बागवान , . खलील खान ,. समीर बागवान प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे सर्व पालक प्रतिनिधी ,सर्व शिक्षिका व  शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग , विद्यार्थी , विविध सामाजिक स्तरावरील व्यक्ती मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते . या कार्यक्रमाला  सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.