
कुडाळ : भारताच्या स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन कुडाळ तहसिल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी ९:०५ वाजता प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक वामनराव मुकुंद तेरसे यांचे नातेवाईक लक्ष्मीकांत जगन्नाथ तेरसे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसिलदार विरसिंग वसावे, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, नायब तहसिलदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.