शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 14 डिसेंबरपासून बेमुदत संप

सर्व घटक संघटनाचा पाठिंबा
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 02, 2023 19:40 PM
views 213  views

कुडाळ :  राज्य सरकारी,निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती च्या झेंड्याखाली जिल्ह्यातील सर्व घटक संघटना एकवटल्या असून कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये  १४ डिसेंबर २०२३ च्या बेमुदत  संपात सहभागी होण्याचा निर्धार आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.तरी सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी १४ डिसेंबरच्या संपात सहभागी होऊन १०० % संप यशस्वी करावा असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे. 

     जुनी पेन्शन,खाजगीकरण, कंत्राटी नोकर भरती, शाळा दत्तक घेणे अशा कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या प्रश्नाविरोधात आवाज उठविणे ही काळाची गरज आहे.त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरण विरोधात आवाज उठविणेसाठी संपाची हाक देण्यात आली आहे. संप मागे घेताना तीन महिन्यात समिती गठित करून पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय देण्यात येईल अस आश्वासन देण्यात  होत.तीन महिन्यात अहवाल प्रसिद्ध करणे आवश्यक असताना सहा महिने झाले उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही शासनाने केलेली नाही.अहवाल तयार असून सुद्धा शासन वेळ काढू धोरण राबवित आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यामधील  असंतोष  वाढत चालला आहे.त्यामुळे १४ डिसेंबर पासून होणाऱ्या बेमुदत संपाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे.

    अद्याप पर्यंत ज्या संघटना समन्वय समितीच्या संपर्कात नाहीत अशा संघटनांनी अध्यक्ष ,सचिव यांचेशी संपर्क साधावा. पुढील सभा  गुरुवार दि.०७ डिसेंबर २०२३ रोजी जुना (DPDC) जुना डीपी हॉल येथे संध्याकाळी ठीक ०४ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, राज्य पदाधिकारी यांनी सर्व सभासद यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती

    तालुकावार सभा घेऊन कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले आहे.  या सभेला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोकण विभागीय सहसचिव मा.संदीप नागे साहेब,जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर,सरचिटणीस सत्यवान माळवे, राज्य कर्मचारी संघटना सरचिटणीस सचिन माने, वर्ग ४ संघटनेचे अध्यक्ष सखाराम संकपाळ,शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक,राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष संजय पवार,नर्सेस संघटना स्टेट क्या अध्यक्षा शिवानी गवंडी,सचिव अनघा बागवे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.