
सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन योजना व इतर मागण्या बाबत शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समन्वय समिती आणी शिक्षक परिषदेने उद्या १४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष भरत केसरकर आणि जिल्हा कार्यवाह नंदन घोगळे यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या संपामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उतरली आहे. या संपात उतरण्याच्या आदेश राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी दिले आहेत.