रानबांबुळी - ओरोस परिसरात विजप्रवाह खंडित होण्याचे प्रकारात वाढ | जनआंदोलनाचा इशारा

Edited by:
Published on: June 11, 2024 08:13 AM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : विजेच्या समस्यांमुळे रानबांबुळी ओरोस येथील जनता त्रस्त झाली असून अवकाळी पावसा पासून आतापर्यंत   परिसरात सातत्याने वीज प्रवाह खंडित होत असल्याने वीज मंडळाच्या या कारभाराबाबत जनतेतून नाराजी आहे , याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास येथील ग्रामस्थांनी जनआंदोलन उभारण्याचा पवित्रा घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी, ओरोस, रानबांबुळी परिसरात आहे , अवकाळी पावसाच्या आधीपासून सातत्याने वीज प्रवाह खंडित होताना दिसत आहे सातत्याने विज प्रवाह खंडित  , विजप्रवाह कमी जास्त होण्याच्या या प्रकारामुळे काही ग्राहकांचे फ्रिज , फॅन व अन्य वस्तू बिघडले जळाले तर काही ना मोबाईल बिघडल्याचाही फटका बसला आहे.

गेल्या काही महिन्यापासून आपत्ती व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाने वीज मंडळाला ओरोस सेक्शन साठी पावसाची आपत्ती माहिती मिळणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे परंतु येथील काही कर्मचारी त्याचा गैरफायदा घेऊन आपल्या परिसरात पाऊस पडणार नसेल तर ही वीज प्रवाह खंडित करण्याचे प्रकार करत आहेत उन्हाळ्याच्या कालावधीत रात्री बारा साडेबारा दीडच्या दरम्यान खंडित करून सकाळी आठ -आठ नऊ -नऊ वाजता पुन्हा विज सुरू करण्याचे प्रकारही घडले, याबाबत रानबांबुळी परिसरातील ग्रामस्थांनी वीज प्रवाह लाईनमन याला याबाबत जाब विचारला होताआणि याबाबत गंभीर दाखल घ्यावी अशी सूचना केल्या होत्या परंतु अजूनही काहीशी विज खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत याबाबत ओरोस वीज मंडळ उपाभियंता आणि संबंधित सहाय्यकअभियंता यांनी योग्य ती दखल न घेतल्यास तसेच पावसाळ्यात सातत्याने वीज ग्राहक खंडित होण्याचे प्रकार वाढू लागल्यास ग्रामस्थांना ओरोस वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक जन आंदोलन उभारावे लागेल असा ईशारा  वीज ग्राहकानी दिला आहे .