
सावंतवाडी : जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणा-या नुकसान भरपाईत वाढ करुन मिळण्याबाबत सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधावे अशी मागणी भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक रामकृष्ण माळकर यांनी केली.
ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या भात शेतीचे अतोनात नुकसान झालेले असल्याने शेतक-यांचे जगणे हालाखीचे झालेले आहे.पावसामुळे ऐन कापणीच्यावेळी भाताशेतीची नासधुस झालेली आहे.तसेच भाताला कोंब आलेले आहेत.तसेच काही ठिकाणी वन्य जनावरामकडुनही भातशेतीची नासधुस होते.अशा कठीण परिस्थितिमध्ये शेतकरी आपले जिवन न डगमगता जगत आहे,तरी या हालचालीच्या परिस्थितिमध्ये शासनाकडून पंचनामे सुरु असुन शेतक-यांना मिळणारी नुकसान भरपाई ही अगदी तुटपुंज्या स्वरुपातील असुन १० गुंठ्यांपर्यत १००० रुपये तर त्या क्षेत्रावर ८५ रुपयाप्रमाणे मिळणारी नुकसान भरपाई अगदी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे.शेतक-यांच्या भातशेतीचे झालेले नुकसान हे या मिळणा-या भरपाई न भागणारे आहे.एक गुंठा शेतीसाठी शेतक-याला भरपुर कष्ट करावे लागतात, तरी या विषयावर सिंधुदू्र्ग जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी शासन दरबारी तात्काळ विषय मांडुन शेतक-यांना मिळणारी नुकसान भरपाई वाढवुन मिळावी याबाबत कार्यवाही करावी.व आपल्या जिल्ह्यातील शेतक-यांना याचा लाभ मिळावा,अशी मागणी केली.












