
देवगड : महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र व जिल्हा उदयोग केंद्र सिंधुदूर्ग आयोजित महिलांसाठी फॅशन डिझायनिंग या मोफत उदयोजकता प्रशिक्षण निवड प्रक्रियाचे उद्घाटन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते देवगड येथे संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब म्हणाले की फॅशन डिझायनिंग हा महिलांना आर्थिक सक्षम करणारा उदयोग असुन हे प्रशिक्षण आत्मसात करून आपले दरडोई उत्पन्न वाढवा, असे आवाहन त्यांनी केले . हे प्रशिक्षण घेताना त्यातील बारकावे व त्यातील ज्ञान आत्मसात करून तुम्ही त्यात मास्टरकी मिळु शकता व तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनु शकता .तसेच अशा प्रशिक्षणाला आमचे नेहमीच सहकार्य असेल असे आश्वासन त्यांनी दिले . यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदूर्गचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांनीही मार्गदर्शन करत महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण आत्मसात करत आत्मनिर्भय व्हावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उदयोग केंद्र सिंधुदूर्गचे उद्योग निरीक्षक पंकज शेळके यांनी उदयोगातील संधी , बारकावे , योजना , दुरदृष्टी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मास्टर ट्रेनर सुर्यकांत लाड , ग्रामसेवक शिवराज राठोड, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर उपस्थित होते . तसेच देवगड तालुक्यातील ५३ महिला उपस्थित होते . हे प्रशिक्षण १ महिन्याचे असुन मोफत असुन प्रशिक्षणार्थीना १ हजार विद्यावेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिकसह , उदयोजकीय व्यक्तीमत्व विकास , संभाषण कौशल्य , बाजारपेठ पाहणी तंत्र , प्रकल्प अहवाल , उदयोग संधी , विविध शासकिय कर्ज योजना इत्यादींचे मार्गदर्शन होणार आहे . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक धुरी व प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांनी सर्वांचे आभार मानले .