
सावंतवाडी : बांदा बाजारपेठ येथील साई छाया बिल्डिंग येथे एक्स रे सेंटर व पॉलीक्लिनिकचा शुभारंभ जेष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ अरविंद खानोलकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बांदा पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या केंद्रात डॉ अमेय स्वार (अस्थीरोग ), डॉ सागर रेडकर (मधुमेह व हृदयविकार ), डॉ राधिका शेटगांवकर (नाक,कान,घसा), डॉ रुक्मा प्रभू (स्त्री रोग ), डॉ श्रद्धा राणे (दमाविकार ), डॉ दत्ताराज बुडकुले (सर्जेरी),डॉ कौशल भोसले (संधी व मणका विकार ) इत्यादी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स येथे सेवा देणार आहेत. तसेच सामान्य रुग्ण तपासणी डॉ.विकास बर्वे स. 10 ते 1 या वेळेत करतील.
या उपक्रमामुळे बांदा व दशक्रोशीतील गरजू रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळणार असल्याने रुग्णांची होणारी गैरसोय कमी होईल. तसेच एक्स रे सेवेचेही गरजू रुग्णांना मदत होईल असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. या केंद्रातील रुग्णसेवेकरीता 9370165324 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.