कुडाळ तहसीलमध्ये वाॅटर प्युरिफायर - वाॅटर कुलंडचं लोकार्पण

Edited by: भरत केसरकर
Published on: May 30, 2023 19:52 PM
views 102  views

कुडाळ : रोटरी सेवा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्यामाध्यमातून कुडाळ तहसीलदार कार्यालयात वाॅटर प्युरिफायर व वाॅटर कुलंड प्लांटचे लोकार्पण तहसीलदार अमोल पाठक व रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष अमित वळंजू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरी सेवा प्रतिष्ठान कुडाळ चे अध्यक्ष रो ॲड राजीव बीले, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष रो अमित वळंजू, तहसिलदार रो अमोल फाटक, सेक्रेटरी रो दिनेश आजगावकर, असिस्टंट गव्हर्नर रो नीता गोवेकर, राजन बोभाटे, गजानन कांदळगावकर, शशिकांत चव्हाण, प्रमोद भोगटे, सचिन मदने, राजीव पवार, रविंद्र परब,रूपेश तेली,रो आनंद वेंगुर्लेकर,प्राथमिक शिक्षक समिती राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, आदी उपस्थित होते.


   कुडाळ तहसीलदार कार्यालयात दैनंदिन कामकाजाबाबत सर्वसामान्य नागरिक येत असतात या सर्वसामान्य नागरिकांना थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने तहसीलदार अमोल पाठक साहेब यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व रोटरी सेवा प्रतिष्ठान कडे आवाहन केले व तातडीने रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने सदर युनिट तात्काळ उपलब्ध करून दिले.यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे माजी अध्यक्ष रो राजन बोभाटे, गजानन कांदळगावकर, ॲड राजीव बिले, असा अमित वळंजू आदींनी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे तहसीलदार अमोल पाठक साहेब यांनी विशेष अभिनंदन व आभार व्यक्त केले.