
वेंगुर्ले : येथे नागरी सुविधा जिल्हा वार्षिक योजना कोकण पर्यटन मधुन विविध मंजूर कामांचे मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन काण्यात आले. रेडी गावातील विविध नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात आली असून या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यात विठोबा मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर रस्ता, यशवंत गड रस्ता नूतनीकरण, मुख्य रस्ता ते परुळेकर घर रस्ता, मुख्य रस्ता ते कामत घर रस्ता, गावातळे गणेशघाटी रस्ता भूमिपूजन तसेच तेरेखोल तिठा भीमनगर सोलर हायमास्ट, हुडा तर सोलर हायमास्ट या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळीयावेळी माजी जि.प .शिक्षण सभापती प्रितेश राऊळ ,सरपंच रामसिंग राणे ,उपसरपंच आनंद भिसे ,सदस्य नमिता नागोळकर ,शमिका नाईक, मानसी राणे, रिया सावंत, स्वप्निल राणे ,रश्मी रेडकर ,तंटामुक्ती अध्यक्ष वैभव असोलकर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश बागायतकर,लिपिक नाना आसोलकर,कर्मचारी सिद्धेश गोसावी तसेच ग्रामस्थ नामदेव राणे, श्याम रेडकर, नंदू रेडकर, जय राणे जगदीश गवंडी ,काका गवंडी, दादा राणे ,आनंद आसोलकर विजय गवंडी, आबा गवंडी, दादा नाईक बंड्या राणे मुकुंद राणे सुनील सातजी,महेंद्र सातजी,दाजी सातजी,नंदू मांजरेकर,तात्या राणे,अमोल राणे,माजी उपसरपंच दीपक राणे, पोलीस पाटील सीताराम राणे,अमित मडये उपस्थित होते.












