सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिकअग्निशमन बंबाचे नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 23, 2023 13:21 PM
views 307  views

कणकवली : नगरपंचायतला मिळालेल्या महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गतच्या अग्निशमन बंबाचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली नगरपंचायतचे वाढते शहरीकरण व जुना बंब नादुरुस्त झाल्याने नवीन बंबासाठी गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानंतर नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या बंबा करीता तात्काळ निधी मंजूर करण्यात आला. या बंबामध्ये 6 हजार लिटर पाणी, 1 हजार लिटर फोम, दोन एचपी चा सबमर्सिबल पंप, बेसिक पावर पंप, अशा विविध 45 अदययावत सुविधा या बंबामध्ये उपलब्ध आहेत. 

कणकवली नगरपंचायत चा अग्निशमन  बंब हा कणकवली शहरातील आग लागण्याच्या दुर्घटनांसह अन्य आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अग्निशमन केंद्र व कर्मचारी वसाहत, आरक्षणाकरिता 4 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा निधी भरणा करण्यात आला असून, उर्वरित आवश्यक निधी व आरक्षण विकासाकरता लागणारा निधी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मागणी करण्यात येईल. व लवकरच हे आरक्षण विकसित केले जाईल अशी माहिती राणे यांनी दिली.

या लोकार्पण प्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, मेघा गांगण, रवींद्र गायकवाड, भाजपा  उपजिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, चारू साटम, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, मनोज धुमाळे, किशोर धुमाळे, अमोल भोगले,, रवींद्र महाडेश्वर, ध्वजा उचले, रुजूता ताम्हणेकर, बाळा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.