भोसले नॉलेज सिटीत 'स्पोर्ट्स फीएस्टा २०२४-२५' चे उदघाटन

Edited by:
Published on: January 30, 2025 19:01 PM
views 90  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटीतील शैक्षणिक संस्थांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 'स्पोर्ट्स फीएस्टा २०२४-२५' चे उदघाटन आज मोठ्या दिमाखात संपन्न झाले. सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच क्रीडा मशाल प्रज्वलीत करून विद्यार्थ्यांच्या हाती सोपवण्यात आली.यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते. खेळभावना जपत स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन यावेळी अमोल चव्हाण यांनी केले. खेळातून मिळणारी ऊर्जा शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरते. येथील नैसर्गिक वातावरण व शिस्तबद्ध आयोजन पाहून आपण भारावून गेलो असल्याचेही ते म्हणाले.यावेळी क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम अशा विविध इनडोअर व आउटडोअर क्रीडाप्रकारांचे उदघाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. ही भव्य क्रीडा स्पर्धा ५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यामध्ये यशवंतरावराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले. सुप्रिया राऊळ यांनी विद्यार्थ्यांना खेळभावनेची शपथ दिली.