घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ग्रामपंचायत तेरवण मेढेत 'निर्मल बँक' प्लास्टिक शेडचं उद्घाटन

Edited by: संदीप देसाई
Published on: August 17, 2023 17:02 PM
views 132  views

दोडामार्ग : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ग्रामपंचायत तेरवण मेढेने या स्वातंत्र्य दिनापासून गावातील प्लास्टिक संकलनसाठी एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी प्लास्टिक कलेक्शन शेड उभारण्यात आल्या असून गावातील प्लास्टिक कलेक्शन या शेडमध्ये एकत्रीकरण केले जाणार आहे.

यासाठी शाळकरी विद्यार्थी सुद्धा स्वच्छता दुत म्हणून महत्वाची भूमिका बजावणार आहेत. प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि प्लास्टिक वर वापरावर असलेली बंदी कचरा वर्गीकरण बाबत गावक्षेत्रात जनजागृती होण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्याना पर्यावरण दूत म्हणून त्यांना  पिशव्या वाटप करण्यात आलेले आहेत. याच पिशव्यांमधून विद्यार्थी घरातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या आणून प्लास्टिक कलेक्शन शेडमध्ये एकत्रित करून गावक्षेत्रात प्लास्टिक बंदी बाबत संदेश देणार आहेत. मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत तेरवण मेढे समोरील 'निर्मल बँक कलेक्शन शेड'चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले व मुलांना पर्यावरण दूत म्हणून पिशव्यांच वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सोनाली गवस, उपसरपंच महेंद्र नाईक, सदस्य मायकल लोबो, निकिता कोरगावकर, नमिता गवस, प्रमोद गवस, दत्ताराम कांबळे, माजी सैनिक, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण दुत म्हणून प्लास्टिक संकलन पिषव्यांच विद्यार्थ्याना वाटप करण्यात आले.