NCP च्या दोडामार्ग जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: December 14, 2023 20:01 PM
views 156  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोडामार्ग तालुका जनसंपर्क कार्यालयाचा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुरू झालेले कार्यालय पक्षाची धेय्य धोरणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सज्ज असेल असे मत यावेळी घारे-परब यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, युवक अध्यक्ष गौतम महाले, महिला तालुकाध्यक्ष ममता नाईक, तालुका उपाध्यक्ष विलास सावळ, शहर सचिव सागर नाईक, केर ग्रामपंचायत माजी उपसरपंच महादेव देसाई, सुभाष लोंढे, आनंद तुळसकर, सुर्याजी नांगरे, फटी कोरगावकर, रविंद्र बांदेकर, उमेश नाईक यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.