मळेवाड नाईकवाडी रस्त्याचा शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: June 18, 2025 21:44 PM
views 534  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून मळेवाड नाईकवाडी ब्राह्मणदेव मंदिर रस्ता शुभारंभ सदस्य अमोल नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्ता ते मळेवाड नाईकवाडी श्री ब्राह्मणदेव मंदिर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. 

यापूर्ण झालेल्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी श्री ब्राह्मणदेव (नाईकवस) मंदिरामध्ये जाऊन देवतेला गाऱ्हाणे घालून ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. गेले पंधरा वर्षापासून ची ग्रामस्थांची रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, सदस्य स्नेहल मुळीक नाईक,माजी पंचायत समिती सदस्य लाडोबा केरकर,ठेकेदार प्रशांत परब,ग्रामस्थ सुरेश नाईक,विशाल नाईक,अनिकेत नाईक, प्रथमेश नाईक, वैभव नाईक कवीनाथ माळकर, कर्मचारी सखाराम जाधव,आपू शेळके, प्रतिक नाईक आदी उपस्थित होते.