वेंगुर्ल्यात महायुतीच्या प्रचार कार्यलयाचे उदघाटन !

Edited by: दिपेश परब
Published on: April 27, 2024 14:58 PM
views 209  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्याच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. येथील सप्तसागर कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या सर्व क्षेत्रातील भरीव कामामुळे आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे.आपला देश प्रगतीपथावर रहाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या ४०० पार संकल्पास नारायण राणे यांना निवडून देवून सिंधुदुर्ग वासियांनी साथ द्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८० ते ९० टक्के मतदान नारायण राणे यांना होण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी रोजगार स्वयंरोजगार विषयक सरकारच्या माध्यमातून केंद्राच्या योजना, केंद्राच्या व राज्याच्या उद्योग मंत्रालयामार्फत आणि सिंधुरत्न योजना मधून झालेली कामे तळागाळातील जनतेपर्यत पोहोचवावी असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले.

     यावेळी भाजपचे माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे  प्रदेश सचिव एम. के. गावडे, महिला नेत्या प्रज्ञा परब, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, शिवसेना जिल्हा संघटक रूपेश पावसकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नियोजन मंडळ सदस्य दिलीप गिरप, कुणाल सरमळकर, साईप्रसाद नाईक, सुषमा प्रभू-खानोलकर, वृंदा गवंडळकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना महिला तालुका संघटक प्राची नाईक, वृंदा मोर्डेकर, कोचरा सरपंच योगेश तेली, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, सुनिल मोरजकर, काशिनाथ नार्वेकर, बाळा दळवी,  माजी जि.प. सदस्य निलेश सामंत, प्रितेश राऊळ, पुनम कुबल, कृपा गिरप-मोंडकर, गणपत केळूसकर, कौशिक परब, अमित परब, सायली परब, शबाना शेख, वसंत तांडेल, दादा केळूसकर, रविंद्र शिरसाट, जगन्नाथ सावंत, संतोष परब, डॉ. पुजा कर्पे, शीतल साळगावकर, प्रणव वायंगणकर, शरद मेस्त्री, अण्णा वजराटकर, धर्मजी बागकर, भूषण सारंग, मितेश परब, समाधान बांदवलकर, प्रकाश मोटे, सुशील चमणकर, प्रसाद पाटकर आदींसह महायुतीच्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई आणि मनसेच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.