बांदेकर फाईन आर्टच्या "कसब २०२४" चं उदघाटन उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2024 07:10 AM
views 115  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण आहे. या भूमीने महाराष्ट्राच्या कला संचालनालयाला सर्वाधिक संचालक दिले. आजही या जिल्ह्यातील कलाकार कलाक्षेत्रात सिंधुदुर्गचे नाव मोठी करीत असताना सावंतवाडीतील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट महाविद्यालय विद्यार्थ्याच्या कलागुणांना पैलू पाडण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या कार्यात सर्वानी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी केले.

डी. जी. बांदेकर ट्रस्ट संचलित बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्टच्या फाउंडेशन कोर्स इन आर्टचे "कसब २०२४" हे वार्षिक कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कलाप्रदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी सतीश पाटणकर बोलत होते. या कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात व कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे असे सांगून पाटणकर म्हणाले की, आज विकास प्रक्रियेमुळे सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. पायाभूत सुविधाताही बदल होत असताना सावंतवाडी सारख्या प्रगत शहरालाही भविष्यात शिक्षण आणि कला संस्कृतीचा हब होण्यासाठी कास धरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पेठे, खजिनदार गीता बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर-परब, अध्यक्ष गोविंद बांदेकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी यशस्वी विध्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. तुकाराम मोरजकर आणि प्रा. सिध्देश नेरुरकर यांनी केले तर आभार प्रा. वेंगुर्लेकर यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सदस्य रमेश पै, प्रकाश मसुरकर, शाम भाट, ऍड. क्षितीज परब आदी मान्यवर उपस्थित होते. कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोविंद बांदेकर आणि सचिव अनुराधा बांदेकर यांनी केले आहे.