'व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड'च्या प्रधान कार्यालयाचे सावंतवाडीत उद्घाटन !

सावंतवाडीत सिंधुदुर्गातील पहिलं बीपीओ सेंटर !
Edited by: भरत केसरकर
Published on: January 13, 2024 13:25 PM
views 149  views

सावंतवाडी :  व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीचं प्रधान कार्यालयाचे सावंतवाडी येथे सोमवारी उदघाट्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.व्हरेनिअम क्लाऊड  लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी कोकणवासीयांच्या प्रेमाखातर  कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले आहेत. आज व्हरेनिअम क्लाऊड  लिमिटेड  मुळे अनेक गरजू तरुण-तरुणींना कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.या कंपनीच्या माध्यमातून आणखी दोनशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कंपनीच्या प्रदान कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी होत आहे.

12 फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वप्रथम कोकणात हर्षवर्धन साबळे यांच्या माध्यमातून कोकणातील या उपक्रमाची सुरुवात झाली. श्री. साबळे यांची आई रत्नागिरी जिल्ह्यातील..आणि म्हणूनच  आपल्या कोकणवासियांसाठी  काहीतरी करावं ही साबळे यांची इच्छा होती. या उद्देशानेच त्यांनी मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस तयार केला.

कोकण विकासात महत्वपूर्ण पाऊल !

हर्षवर्धन साबळे  कोकणात आले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं की, कोकणात अनेक तरुण बेरोजगार आहेत. अनेक तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय. आणि त्यासाठीच त्यांनी कोकणात डिजिटल तंत्रज्ञान उभं करण्याचा मनोदय व्यक्त केला. या माध्यमातून अनेक नोकऱ्या उपलब्ध होतील याची त्यांना कल्पना होती.

२०० हुन अधिक तरुणांचं भविष्य झालं उज्वल !

व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड च्या माध्यमातून हर्षवर्धन साबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  २०० हुन अधिक तरुण तरुणींना रोजगार देऊन आपलं हे स्वप्न सत्यात साकारला आहे. व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे. सावंतवाडी मधील जिमखाना मैदाना शेजारील भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे. या कंपनी सोबत सिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी ने 2023 मध्ये करार केला आहे.यामुळे हायड्रा अंतर्गत तयार केलेल्या बहुपयोगी कम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चर चा फायदा घेऊन ग्रामीण भागातील उच्च संगणकीय बीपीओ सेंटर सावंतवाडी सारख्या भागात सुरू झाले आहे.

तळकोकणातलं पहिलं बी पी ओ सेंटर !

खर तर अशी बी पी ओ सेंटर ही मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असतात मात्र सावंतवाडी सारख्या ग्रामीण भागात बीपीओ सेंटर सुरू करण्याचा धाडसी निर्णय हर्षवर्धन साबळे यांनी घेतला. सावंतवाडी मध्ये बीपीओ सेंटर बरोबरच ब्रँड एज, हायड्रा अंतर्गत तयार केलेल्या बहु वापर phy -gital कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेऊन ग्रामीण भागात उच्च संगणकीय बीपीओ सेंटर उभ केला आहे.  सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेले बीपीओ सेंटर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेले पहिल बिपिओ सेंटर आहे. या बीपीओ मध्ये 125 हुन अधिक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सिक्युअर क्रेडेनशियल, स्ट्रायकर, एफ एस आणि arrise च्या वाढत्या क्लाइंटबेससह डेटा एन्ट्री अकाउंटिं,बॅकग्राऊंड वेरिफिकेशन, डेट रिकवरी यासारख्या सेवांचा समावेश सावंतवाडीतल्या बीपीओ सेंटर मध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून बहुउपयोगी फिजिटल पायाभूत सुविधांचा आणि त्याच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनी ने सिंधुदुर्ग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात एक उत्तुंग असं पाऊल टाकलं आहे. ग्राहकांसाठी व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


 रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना मिळाली रोजगाराची संधी !

व्हरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रोजगाराबरोबर अनेक उपक्रम गेल्या काही वर्षात राबविलेले आहेत. तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बेरोजगार मिळावे सुद्धा आयोजित केले होते.कुडाळ आणि सावंतवाडी मध्ये हे रोजगार मेळावे झाले.या दोन्ही मेळाव्यात अनेक नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या.  या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून  अनेक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.


व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड प्रधान कार्यालयाचे उदघाटन सोहळा  !

व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडच्या अंतर्गत हायड्रा हे केंद्र सावंतवाडीत सुरु होत आहे . हायड्रा या ब्रँड नावाने डेटा सेंटर तसेच बी पी ओ  सेंटरचे जाळे कोकणात तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे . हायड्रा या ब्रँड नावाने मेक इन इंडिया या प्रोजेक्ट खाली स्थानिक तरुण आणि तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या भारतीय डिजिटल तंत्रज्ञान कंपनीने डिझाइन केले आहे . या द्वारे लहान शहरे आणि विखुरलेल्या ठिकाणी सेवा देणे या मागचा उद्देश आहे . या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.

 या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उदघाटन सावंतवाडी, नारायण आर्केड येथे व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. हर्षवर्धन साबळे यांच्या उपस्थितीत सोमवार दि . १५ जानेवारी २०२४ होत आहे.