आज 'इको प्राईम' कारखान्याचं उद्घाटन...!

Edited by: विनायक गावस
Published on: September 03, 2023 11:17 AM
views 242  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गात प्रथमच सावंतवाडीतील युवक यश सावंत पेपर बॅग फॅक्टरी सुरु करत आहेत. 'इको प्राईम'या पेपर बॅग, ग्रॉसरी बॅग, शॉपिंग बॅग, प्रिंटेड पेपर बॅग या नविन कारखान्याचा उद्घाटन समारंभ आज ३ सप्टेंबर रोजी सायं. ४.०० वाजता पार पडणार आहेत. उद्यमनगर, माजगांव येथे सुप्रसिद्ध तबलावादक किशोर सावंत यांच्या हस्ते या फॅक्टरीचा शुभारंभ होणार आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच पेपर बॅग फॅक्टरी या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन सातेरी मॅचिंग सेंटरच्यावतीन करण्यात आलं आहे.