दिवाळी अंक प्रदर्शनाचा संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ !

''कावळ्यांची अंडी आणि गडगडलेल सरकार'' कथा आवर्जून वाचण्याचं प्रा. बांदेकर यांचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 22, 2022 16:15 PM
views 154  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी ग्रंथालयातर्फे सभासद वाचकांना  दीपावली निमित्त, दिवाळी अंक वाचक योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळी अंकांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. 

सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर ग्रंथालयातर्फे सभासद वाचकांना दिपावली निमित्त दिवाळी अंक वाचक योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळी अंकांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले असून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते याच उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर  दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली माझी ''कावळ्यांची अंडी आणि गडगडलेल सरकार'' ही कथा आवर्जून वाचा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केल.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दिवाळी अंक आणि साहित्य हे लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. त्यासाठी श्रीराम वाचन मंदिराच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. वाचन मंदिरासारख काम कुठलीही संस्था करु शकत नाही, १८५२ पासून श्रीराम वाचन मंदिराच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवून ठेवली आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. 

कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. आभार वाचन मंदिराचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी व्यक्त केले. यावेळी हे दिवाळी अंक 100 रु. वर्गणीमध्ये 100 दिवसासाठी वाचकांना घरी वाचनासाठी उपलब्ध होतील. तरी जास्तीत जास्त वाचकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी संजू परब, रमेश बोंद्रे, प्रवीण बांदेकर, बाळा बोर्डेकर, राजेश मोंडकर, अँड. संतोष सावंत, महेंद्र पटेल, रंजना कानसे, गुरूप्रसाद वाडकर आदी उपस्थित होते.