'आनंदोत्सव' सोहळ्याचे उदघाटन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 16, 2024 08:07 AM
views 97  views

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, मुंबई आणि सिंधुदुर्ग कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत "आनंदोत्सव"  सोहळ्याचे आयोजन केले आहे. यासोहळ्यानिमित्त आयोजित आनंदोत्सव व कृषी प्रदर्शनाचे उदघाटन १५ फेब्रुवारी २०२४ रोजी कऱण्यात आले. याप्रसंगी भारताचे पद्मविभूषण अनुशास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर आणि ब्रिगे. सुधीरजी सावंत उपस्थित होते. 

या आनंदोत्सव कार्यक्रमामध्ये बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना कलाकृती सादर करण्याचा योग प्राप्त झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती ताराराणी यांच्या जीवन क्रमावर पोवाडा सादर केला. या पोवाड्यामध्ये , छ.शिवाजी महाराज - मंथन सावंत, छ. ताराराणी - प्रणाली ठोंबरे, येसूबाई - जिया सावूळ, राजाराम महाराज - गंधर्व बंड, हंबीरराव मोहिते - भरत, छोटी ताराराणी - योगिता बोभाटे, औरंगजेब - रंजीत प्रसाद, औरंगजेबाचे साथी - आयुष जाधव, रुद्र पोकर तसेच छोट्या शिवाजीच्या भूमिकेत स्वरूप बोभाटे, शाहीर - दुर्वांक कालींगण, शाहीर साथीदार - करिश्मा दास, महेक मालविया, यश कुलकर्णी, कावेरी वाघमोडे, युवराज रावले, समर्थ लवटे या विद्यार्थ्यानी सहभाग दर्शवून उत्कृष्टरित्या पोवाडा सादर केला. 

आनंदोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारताचे पद्मविभूषण अनुशास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर आणि ब्रिगे. सुधीरजी सावंत यांच्याकडून बाल कलाकारांचा गौरव करण्यात आला. यादरम्यान संस्थेच्या सचिव सौ. सुलेखा राणे व संस्थेचे डायरेक्टर श्री. संदिप सावंत उपस्थित होते. 

सदर पोवाडा यशस्वीरीत्या सादर करण्यासाठी श्रीपाद बाणे, जिष्णा नायर, संपदा नर, आनंद मेस्त्री त्याचसोबत संबळ वादक श्रीधर पाचंगे, टाळ वादक अमित पांचाळ यांचे सहकार्य लाभले.