
कुडाळ : ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे )अंतर्गत कृषी महाविद्यालय दापोली येथील कृषी तारा गटाने कुडाळ तालुक्यातील गोठोस गावात कृषी माहिती केंद्राची सुरुवात केली. या माहिती केंद्रात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध यंत्राचे व शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
माहिती केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक नाना कदम यांचे हस्ते करण्यात आले. रावे अंतर्गत विद्यार्थी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञाना विषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमास सरपंच सुरज कदम,उपसरपंच सौ. उर्मिला कदम,तलाठी संतोष बांदेकर कृषी सहाय्यक धनजय कदम मान्यवर उपस्थित होते. आदिनाथ चाहेर यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ. संदिप गुरव, कार्यक्रमाधिकारी डॉ. रणजित देव्हारे यांचे सहकार्य लाभले.
कृषी तारा गटाचे विद्यार्थी आदिनाथ चाहेर, सूरज आगळे, आदित्य खोकले,कृष्णा बोडके, विठ्ठल यदलवाड, स्वानंद निरगुडे, अथर्व नवल आदी उपस्थित होते.